गोरेगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक

मुंबई – गोरेगावमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या शाहरूख के या तरुणावर ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करून गोरेगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

पीडित १७ वर्षांची मुलगी येथील भगतसिंगनगर परिसरात राहते. गोरेगावच्या एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. मुलीच्या शेजारी धर्मांध शाहरूखची बहीण रहाते. बहिणीकडे येणार्‍या शाहरूख याने एक मासापासून मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न चालू केला; मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे शाहरूखने ११ ऑक्टोबरला महाविद्यालयातून येणार्‍या पीडित मुलीचा हात धरून सोबत येण्यास सांगितले; मात्र मुलीने नकार देत घरी येऊन हा प्रकार सांगितल्यावर पालकांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात शाहरूखच्या विरोधात तक्रार दिली.


Multi Language |Offline reading | PDF