पुणे जिल्हाधिकार्‍यांना ‘गिरीवन’प्रकरणी नोटीस

मुंबई – मुळशी तालुक्यातील ‘गिरीवन’ हा हिल स्टेशन प्रकल्प अनधिकृत असून शेतकर्‍यांच्या भूमी लाटून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. याविषयी तीन महिन्यांत चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी पुणे जिल्हाधिकार्‍यांना दिले होते; मात्र वर्ष उलटल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाने याविषयी निर्णय घेतला नसल्याने उच्च न्यायालयाने १० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी सौरभ राव यांना तुमच्याविरुद्ध न्यायालय अवमान कायद्यातील नियम ९ अन्वये न्यायालय अवमानाची कारवाई का करू नये’, अशी कारणे दाखवा नोटीस काढली होती.


Multi Language |Offline reading | PDF