गुरुमाऊलीच्या स्मरणाने देहभान विसरून जाई ।

सौ. अंजली विभूते

गुरुमाऊली म्हणजे, हृदयस्पर्शी प्रेमळ माया ।

गुरुमाऊली म्हणजे, कृष्णाला आवडणारे कोमल लोणी ॥ १ ॥

मातेइतकीच प्रेमळ असते ती गुरुमाऊली ।

गुरुमाऊलीची असते सतत साधकांवरी कृपा भारी ॥ २ ॥

धडपडणार्‍या साधकाच्या ओठी, पहिला शब्द येतो ‘गुरुमाऊली’ ।

गुरुमाऊली म्हणजे, टणक नारळातील मधुर पाणी ॥ ३ ॥

गुरुमाऊलीच असे, साधकांचा जीव कि प्राण ।

गुरुमाऊलीच साधकांना देते साधनेचे ज्ञान ॥ ४ ॥

गुरुमाऊलीच देते साधकांचे रक्षण करण्या उपायांचे शस्त्र ।

गुरुमाऊलीच देते दैनिकरूपी गीतेचे ज्ञान ॥ ५ ॥

गुरुमाऊलीच देते, साधकांना अनुभवण्या आश्रमजीवन ।

गुरुमाऊलीच दावी साधकांना मोक्षाची वाट ॥ ६ ॥

गुरुमाऊलीच्या स्मरणाने देहभान विसरून जाई ।

गुरुमाऊलीची साथ असता, अपुरा पडे हा जन्मही ॥ ७ ॥

गुरुमाऊलीच्या समवेतचा आनंद, प्रत्येक क्षणी अनुभवता येई ।

गुरुमाऊलीचे साधक असती गुरुचरणी लीन भारी ॥ ८ ॥

– सौ. अंजली बाळासाहेब विभूते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.२.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now