राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगात सांगितल्याप्रमाणे भावपूर्ण प्रार्थना केल्यावर रामनाथी आश्रमातील साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कु. प्रियांका लोटलीकर

१. समष्टीसाठी प्रार्थना करतांना ‘आता आपले काही नाही. जे काही आहे, ते समष्टीचे आहे’, असा विचार मनात येऊन कृतज्ञता वाटणे अन् ‘स्वतः हलकी होऊन वर जात आहे’, असे जाणवणे

‘११.१.२०१७ या दिवशी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी मला समष्टीसाठी करत असलेल्या प्रार्थना वाढवण्यास सांगितले. १८.१.२०१७ या दिवशी भाववृद्धी सत्संगात प्रार्थनेचे महत्त्व सांगितले. त्यामुळे मी समष्टीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रार्थना करू लागले. त्या वेळी मला ‘माझे मन व्यापक होत आहे’, असे जाणवले आणि ‘आता आपले काही नाही. जे काही आहे, ते समष्टीचे आहे’, असा विचार मनात आला. तेव्हा मला एका भजनातील पुढील ओळी आठवल्या, ‘हा देह न माझा उरला । दत्त दिगंबर तो झाला ॥ हा श्‍वासही जपतो आता । त्या दत्ताच्या नामाला ॥’ मला पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली आणि ‘मी हलकी होऊन वर जात आहे’, असे मला जाणवले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सेवेतील अडचणी सोडवण्यासाठी प्रार्थना केल्यावर त्यांनी प्रत्यक्ष समोर येऊन अडचणींवर उपाय सांगणे

२०.१.२०१७ या दिवशी मी माझ्या संगणकीय सेवेत येत असलेल्या आणि अन्य अडचणींमुळे हतबल झाले होते. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘हे गुरुमाऊली, सेवेत येणार्‍या या अडचणी माझ्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत आणि त्या सोडवण्यास मी असमर्थ आहे. हे गुरुमाऊली, तूच या अडचणी सोडव.’ त्या वेळी सूक्ष्मातून काही क्षणांत परात्पर गुरु डॉ. आठवले आले. त्यांनी मला विचारले, ‘सध्या कोणती सेवा करत आहेस ?’ मी त्यांना सेवेतील अडचण सांगितली. त्यावर त्यांनी उपाय सांगितला आणि ते मला म्हणाले, ‘तू हीच प्रार्थना केली होतीस ना ?’ त्या वेळी माझी भावजागृती झाली. देवाला सर्वच कळते. ‘आपण केवळ प्रार्थना करून त्याला आळवल्यावर देव आजही धावून येतो’, याची ही प्रत्यक्ष अनुभूती आली.

३. मनाची स्थिती ठीक नसल्यामुळे आत्मनिवेदन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि त्या वेळी भ्रमणभाषवर आलेल्या संदेशातील बोल वाचतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले ‘साधनेविषयी कसा विचार असायला हवा ?’, हे सांगत आहेत ’, असे वाटणे

२२.१.२०१७ या दिवशी माझ्या मनाची स्थिती ठीक नव्हती आणि मला आध्यात्मिक त्रास होत होता. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करत होते. त्यांना आळवून प्रार्थना करत होते, ‘गुरुमाऊली, मला या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी तूच मार्ग दाखव.’ त्या वेळी काही वेळातच माझ्या भ्रमणभाषवर एक संदेश आला. त्यातील बोल वाचल्यावर मला वाटले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले मला ‘साधनेच्या संदर्भात कसा विचार असायला हवा ?’, हे सांगत आहेत.’ त्या वेळी ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष असते !’, या विचाराने कृतज्ञतेपोटी मला भावाश्रू आले.

४. काही दिवसांपासून प्रार्थना करतांना माझे केवळ हात जोडले जातात; परंतु त्यात शब्द नसतात. कृतज्ञताभावाने केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होत असते.

५. वरील अनुभूती आल्यावर मला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि भाववृद्धी सत्संग घेणार्‍या साधिका यांच्याप्रती कृतज्ञता वाटली, तसेच त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्याने मला देवाचे रूप आळवता आले आणि भावजागृती झाली.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now