‘वातावरणाचा ऋतुप्रमाणे व्यक्तीवर परिणाम होतो’, हे जाणून पोषक वातावरण निर्माण होईल, अशा कृती कराव्या !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज

‘समाजाचा मी एक भाग आहे, माझा समाजाशी अनन्य संबंध आहे, हे समजले पाहिजे. ‘माझे समाजाशी काही देणे घेणे नाही’, असे म्हणून चालणार नाही. समाजात ज्या वाईट गोष्टी चालल्या आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. ‘त्यांच्यासंदर्भात मी काय केले पाहिजे ?’ या दृष्टीने पाहून शुद्धीकरण केले पाहिजे. या वातावरणाचा माझ्यावर ऋतुप्रमाणे परिणाम होणार आहे. माझा विश्‍वाशी, म्हणजेच समष्टीशी संबंध आहे. त्यासाठी अभिषेक आहे. सहस्रो पुरुष सुक्ते आहेत. मी विराट होतो; म्हणून माझा विराटाशी संबंध आहे.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.