देवतांच्या चित्रांचे फटाके ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्याच्या विरोधात प्रभादेवी (जिल्हा मुंबई) येथील धर्माभिमानी संदेश पवार यांचा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

पोलिसांकडून तक्रार अर्ज घेण्यास ४ घंटे टाळाटाळ

देवतांचा अवमान रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या श्री.संदेश पवार यांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी घ्यावा !

मुंबई, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – देवतांची चित्रे असलेले फटाके संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्याचे लक्षात येताच प्रभादेवी येथील धर्मप्रेमी श्री. संदेश पवार यांनी ९ ऑक्टोबर या दिवशी दादर पोलीस ठाण्यात धर्मभावना दुखावल्याचा तक्रार अर्ज दिला. या वेळी तक्रार लिहून घेण्यास टाळाटाळ करण्यार्‍या पोलिसांनी ४ घंट्यांनी तक्रार लिहून घेतली. (अल्पसंख्यांकांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता पोलीस स्वत:हून कारवाई करतात; मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांचा प्रश्‍न असल्यास त्याची साधी तक्रारही लिहून घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. प्रशासनाची हिंदूंच्या धर्मभावनांविषयी उदासीनता दूर करण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – संपादक)

याविषयी सविस्तर वृत्त असे की,

१. संकेतस्थळावर देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवले असल्याचे लक्षात येताच हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर यांच्यासह श्री. संदेश पवार फुले मंडई येथील पोलीस मुख्यालयातील ‘सायबर सेल’च्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेले. या वेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले.

२. यानंतर श्री. पवार आणि श्री. मानकर दोघेही दादर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक दरेकर यांनी ‘मी लहानपणापासून अशी चित्रे असलेले फटाके पहातोय. ही कंपनी तमिळनाडू येथील आहे. तक्रार तिकडे झाली पाहिजे. येथे अशा प्रकारची चित्रे दिसली का ? ती फोडली का ? ऑनलाईन तर आहेत’, असे वक्तव्य केले. (मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानापासून केवळ २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलिसांची अशी मानसिकता, तर राज्यातील अन्य पोलीस ठाण्यांविषयी काय बोलावे ? – संपादक)

३. यावर श्री. संदेश पवार यांनी ‘आम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकतो आणि मी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो’, असे सांगितल्यावर पोलीस उपनिरीक्षक दरेकर यांनी तक्रार नोंद करून घेण्याविषयी वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी विचारून सांगतो, असे सांगितले.

४. त्यानंतर देवकर यांनी तक्रार वाचून ‘फटाके बनवणारे आस्थापन नोंदणीकृत असून त्यांना तसे अधिकार आहेत. त्यामुळे त्या आस्थापनेवर कारवाई करता येणार नाही’, असे सांगितले. (हिंदूंच्या देवतांचा व्यावसायिक लाभासाठी वापर करण्याचा अधिकार कोणता कायदा देतो, हे देवकर यांनी सांगावे. असेच उत्तर मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर दिले असते का ? – संपादक)

५. यावर श्री. संदेश पवार यांनी ‘अन्य धर्मियांविषयीही आपण असेच मत व्यक्त केले असते का’ ? असा प्रश्‍न विचारल्यावर पोलीस उपनिरीक्षक दरेकर रागावले आणि ‘तुम्हीच धर्माधर्मांत तेढ निर्माण करता’, असे म्हणाले. याविषयी वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी ‘संबधित आस्थापनावर कारवाई करता येणार नाही, असे सांगितले. तुम्ही न्यायालयाद्वारे जनहित याचिका प्रविष्ट करा. २ दिवसांत आमची प्रक्रिया करून पुढे सायबर सेलकडे तक्रार हस्तांतरित केली जाईल, असे वरिष्ठांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now