भिवंडी शहरातील ३० अनधिकृत दूरध्वनी केंद्रावर कारवाई, ९ धर्मांध कह्यात

एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दूरध्वनी केंद्र चालू होईपर्यंत झोपलेले पोलीस प्रशिक्षित आतंकवाद्यांची संपर्क यंत्रणा कशी शोधणार ?

ठाणे, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – भिवंडी शहरात ३० अनधिकृत दूरध्वनी केंद्रावर कारवाई करण्यात आली असून ठाणे गुन्हे विभागाच्या भिवंडी विभाग २ शाखेने छापे घालून नियाज अहमद मोहमद इब्राहिम शेख, मोहंमद शकिर इर्शाद अहमद मोमिन, नदिम अली शेर अली शेख, महंमद उमर अजीजुर्रहमान खान, महंमद अर्शद मुमताज अहमद शेख, महंदम पुैजैल एजाज अहमद शेख, समशाद अहमद इसामुद्दीन अन्सारी, फकेआलम महंमद शहजहांन शेख आणि महंमद आलीम बद्रीजमा शेख या ९ धर्मांधांना कह्यात घेतले आहे. (स्वत:ला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक) या प्रकरणी शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

१. आंतरराष्ट्रीय व्हि.ओ.आय.पी. कॉल हे ‘सेल्यूलर नेटवर्क’शी स्थानिक संपर्क म्हणून जोडले जायचे. त्यामुळे सदर दूरध्वनी कोणत्याही सुरक्षा यंत्रणेला समजू शकत नाही.

२. भिवंडीतील या बनावट दूरध्वनी केंद्राचा दाऊद टोळीकडून व्यापार्‍यांना धमकी देण्यासाठी वापर केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीनेे तपास चालू आहे.

३. अंबरनाथ येथील एका व्यापार्‍याला खंडणीसाठी ऑगस्ट महिन्यात धमकावण्यात आले होते. पोलिसांनी या दूरध्वनीची पडताळणी केली असता, तो ओडिसा येथून आल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक ओडिसा येथे गेले असता, तो दूरध्वनी तेथून केलाच नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आंतरराष्ट्रीय दूरध्वनी बनावट दूरध्वनी केंद्राद्वारे ‘रूट’ करून त्या व्यापार्‍याला जोडला गेल्याचे समजले.

४. अशा बनावट दूरध्वनी केंद्राचे जाळे भिवंडीत असल्याची माहिती समोर आल्याने गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १० ऑक्टोबरला दिवसभर शहरातील गैबीनगर, शांतीनगर, साईनगर, पिराणीपाडा, इत्यादी विविध ठिकाणी छापे घालून कारवाई केली.

५. धर्मांधांकडून राऊटर, २५ सीम बॉक्स, रिलायन्स, एअरटेल, आयडीया, बी.एस्.एन्.एल्. अशा नामांकित आस्थापनांचे ४३८ सीमकार्ड, भ्रमणसंगणक असा एकूण २१ लक्ष ६१ सहस्र १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

६. यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हे प्रविष्ट करण्याचे काम चालू होते. या प्रकरणी आणखी २५ ते ३० जणांना कह्यात घेण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF