काश्मीरमधील चकमकीत २ सैनिक हुतात्मा

२ आतंकवादी ठार

पाकला नष्ट करणे, हाच काश्मीरमध्ये शांतता नांदण्यासाठीचा एकमेव उपाय आहे, हे सरकारला कधी कळणार ?

श्रीनगर – येथील बांदिपोरा भागात जिहादी आतंकवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना हवाई दलाचे २ सैनिक हुतात्मा झाले. याशिवाय १ सैनिक घायाळ झाला आहे. या वेळी सैन्यदलाने २ आतंकवाद्यांना ठार मारले.

बांदिपोरामधील हाजिन भागात आतंकवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळताच सैन्याने या भागात शोधमोहीम चालू केली. या वेळी एका घरात लपून बसलेल्या आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार करण्यास प्रारंभ केला. आतंकवाद्यांच्या गोळीबाराला सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. पहाटे पावणेपाच वाजल्यापासून आतंकवादी आणि सीमा सुरक्षा दलाचे सैनिक यांच्यात चकमक चालू आहे. यामध्ये २ आतंकवादी ठार झाले. गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’ हाती घेतले आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत १५० हून अधिक आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात सैनिकांना यश आले आहे.

दुप्पट व्यय (खर्च) करूनही काश्मीरमधील आतंकवादी घटनांत वाढ

मागील ७० वर्षांत एका राज्यातील आतंकवादाचा बीमोड करू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयशच !

नवी देहली – विद्यमान केंद्र सरकारच्या ३ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काशीरमध्ये आतंकवादी घटनांत वाढ झाल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीत उघड झाले आहे. उत्तरप्रदेशमधील नोएडा येथील सामाजिक कार्यकर्ता रंजन तोमर यांनी ही माहिती मागवली.

१. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने शेवटच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात आतंकवादाशी लढण्यासाठी अनुमाने ८५० कोटी रुपये दिले होते, तर विद्यमान सरकारने १ सहस्र ८९० कोटी रुपये दिले आहेत.

२. मे २०११ ते मे २०१४ या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाच्या ७०५ घटना घडल्या असून त्यात ५९ नागरिक ठार, तर १०५ सैनिक हुतात्मा झाले होते.

३. मे २०१४ ते मे २०१७ या कालावधीत आतंकवादाच्या ८१२ घटना घडल्या असून त्यात ६२ नागरिक ठार, तर १८३ भारतीय सैनिक हुतात्मा झाले.

काश्मीरमधील २ पोलीस हिजबुल मुजाहिदीनला शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचे उघड

अशा देशद्रोह्यांचा भरणा असलेल्या पोलीस दलाकडून राष्ट्राच्या संरक्षणाची कशी अपेक्षा करणार ?

श्रीनगर – काश्मीरमधील २ पोलीस हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेला शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचे उघड झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात ९ ऑक्टोबरला आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या वेळी सैनिकांनी एका आतंकवाद्याला पकडले होते. त्याच्याकडून एके-४७, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हस्तगत केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now