पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने फलकांवरून ‘अंबाबाई’ नाव हटवल्यामुळे वादंग

देवीच्या नावाचेही वावडे असणारी देवस्थान समिती

मंदिराचा कारभार कसा हाकत असेल, हे वेगळे सांगायला नको ! यास्तव मंदिरे भक्तांच्याच कह्यात हवीत !

कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ‘अंबाबाई’ हे नाव काढून टाकले आहे. याविषयी श्री अंबाबाईच्या भक्तांनी आक्षेप घेतला असून सरकारला निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद केले आहे की,

१. श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरात, तसेच चारही दरवाज्यांवर विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर अंबाबाई मंदिर, तसेच महालक्ष्मी मंदिर असा उल्लेख आहे; मात्र देवस्थान समितीने लावलेल्या फलकांवर ‘करवीरनिवासिनी देवस्थान’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

२. देवीचे नाव हटवण्यामागे शासनाच्या म्हणजेच देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाविषयी आकस का आहे ? देवस्थान समितीने याविषयी तातडीने खुलासा करावा आणि नाव पूर्ववत् करावे.