चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलमध्ये रहाण्यास बंदी

पेइचिंग – चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलमध्ये रहाण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या १८ ऑक्टोबरपासून या निर्णयाची कार्यवाही करण्याची घोषणा चीन सरकारने केली आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात उइगर मुसलमान समाज मोठ्या संख्येने असून त्यांच्याकडून आतंकवादाला उत्तेजन देण्यात येत असल्याचा आरोप करत चीनने धडक मोहीम उघडली आहे. सरकारच्या नव्या आदेशाची कार्यवाही करतांना प्रशासनाने तत्परता दाखवत १८ ऑक्टोबरचीही वाट न बघता त्वरित कार्यवाही चालू केली आहे. मुसलमानांना हॉटेलमध्ये रहाण्यास दिल्यामुळे एका हॉटेलला दंडही ठोठावण्यात आला आहे.