हिंदु राष्ट्र हीच नेपाळची खरी ओळख ! – कमल थापा

काठमांडू – हिंदु राष्ट्र हीच नेपाळची खरी ओळख आहे. त्यामुळे नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना करण्याची घोषणा राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने केली आहे, असे या पक्षाचे अध्यक्ष कमल थापा यांनी सांगितले. नेपाळ सनातन धर्म आणि संस्कृती संघटनेचे येथे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘नेपाळ पूर्वीही हिंदु राष्ट्र होते, आताही ते हिंदु राष्ट्र आहे आणि पुढेही ते हिंदु राष्ट्रच असेल, असे थापा यांनी सांगितले.

थापा म्हणाले, ‘‘नेपाळमधील सामाजिक सद्भावना, कौटुंबिक जीवन आणि राष्ट्र यांतील संबंध हे सनातन नीतीमूल्यांवर आधारित आहेत. नेपाळमधील समविचारी पक्षांच्या साहाय्याने देशात हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना करण्यात येईल.’’