फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धर्मप्रसार करून घरबसल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापक सेवा करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक, जिज्ञासू अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सध्या समाजमनावर सामाजिक प्रसारमाध्यमांचा (सोशल मिडियाचा) पुष्कळ प्रभाव आहे. फेसबूक, ट्विटर, गूगल प्लस, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आदी संगणकीय प्रणालींचा जनसामान्यांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

१. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे घरबसल्या धर्मप्रसार करा !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संकेतस्थळांवर वाचनीय ज्ञानसंपदा उपलब्ध आहे. साधक, तसेच वाचक, हितचिंतक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी आपले कुटुंबीय, नातेवाईक, स्नेही, कार्यालयातील सहकारी, परिचित आदींना या संकेतस्थळांवरील अमूल्य माहिती, तसेच ऑडिओ, व्हिडिओ पाठवून धर्मप्रसाराच्या अनमोल संधीचा लाभ घेऊ शकतात. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवल्यास केवळ भारतभरातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धर्मप्रसार घरबसल्या होऊ शकतो.

२. राष्ट्र-धर्म, तसेच अध्यात्म यांविषयी अनमोल ज्ञान देणारी विविध संकेतस्थळे !

३. www.Balsanskar.com या संकेतस्थळावर पाल्य आणि पालक या दोघांसाठीही मार्गदर्शक मजकूर उपलब्ध !

या संकेतस्थळावर आदर्श बालक कसे बनावे ? चांगल्या सवयी अंगी कशा बाणवाव्यात ? अभ्यासाचे सुनियोजन कसे करावे ? इत्यादी विषयांवरील लेखमालिका आहे. देवता, संत, ऋषिमुनी, हिंदु राजे, भारतीय स्वातंत्र्यसेनानी यांच्या कथा, तसेच राष्ट्र आणि धर्म यांप्रती प्रेम निर्माण होण्यासाठी उपयुक्त मजकूर उपलब्ध आहे. आदर्श पालक कसे बनावे ?, मुलांवर सुसंस्कार करण्याचे महत्त्व काय ?, मुलांच्या समस्या कशा सोडवाव्यात ? आदी विषयांवरील अनमोल आणि वाचनीय माहिती पालकांसाठीही उपलब्ध आहे.

४. जिज्ञासूंना साधनेचे महत्त्व पटवून देणार्‍या www.SSRF.org या संकेतस्थळावर २२ भारतीय आणि विदेशी भाषांमधील लेखसंपदा उपलब्ध !

www.SSRF.org या संकेतस्थळावर मनुष्य जीवनातील विविध समस्यांचे कारण काय ?, या समस्यांच्या निवारणासाठी साधना करण्याचे महत्त्व काय ?, साधनेद्वारे आनंदप्राप्ती कशी होते ?, जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ? आदी आध्यात्मिक संशोधनावर आधारित लेखमालिका आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, नेपाळी यांसह पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्लोव्हेनियन, इंडोनेशियन, रोमेनियन, व्हिएत्नामीस, क्रोएशियन, स्पॅनिश, मलेशियन, हंगेरियन, सर्बियन, डच, चिनी, इटॅलियन, मॅसिडोनियन आणि बल्गेरियन या २२ भाषांतील मजकूर उपलब्ध आहे.

५. संकेतस्थळांद्वारे कशा प्रकारे धर्मप्रसार करावा ?

अ. प्रत्येक लेखाच्या (आर्टिकलच्या) शेवटी असलेल्या फेसबूक, ट्विटर, गूगल प्लस आदींच्या आयकॉनवर क्लिक केल्यास तो लेख प्रसारित (शेअर) करता येतो.

आ. आपल्याला आवडलेली एखादी माहिती अथवा वेबपेज प्रसारित करायचे असल्यास त्याची संगणकीय मार्गिका (लिंक) कॉपी करून ती इतरांना पाठवू शकतो.

संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्याच्या संदर्भात काही अभिनव संकल्पना अथवा वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सुचल्यास वा धर्मप्रसार केल्यानंतर समाजाकडून चांगला प्रतिसाद लाभला असल्यास त्याची माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.