बांगलादेशमध्ये शरणार्थी म्हणून रहाणार्‍या २२ रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांना अटक

अटकेतील आतंकवाद्यांनी म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार केले होते !

भारतातील ७० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून लावण्यासाठी भारत सरकार कशाची वाट पहात आहे ? आतातरी भारतातील तथाकथित मानवतावादी या घटनेकडे लक्ष देतील का ?

ढाका – म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांच्या अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या २२ आतंकवाद्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली. ते येथे शरणार्थी म्हणून रहात होते. या आतंकवाद्यांनी यापूर्वी बांगलादेशच्या सैन्यावर आक्रमण केले होते, असे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. या आतंकवाद्यांना पाकने आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले आहे.