योगी आदित्यनाथ सरकार अयोध्येत शरयू नदीच्या किनारी भगवान श्रीरामाची १०० मीटर उंच मूर्ती स्थापन करणार !

सरकारने प्रथम अयोध्येत राममंदिर निर्माण करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

अयोध्या – उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार अयोध्येत शरयू नदीच्या किनारी भगवान श्रीरामाची १०० मीटर उंच मूर्ती स्थापन करणार आहे. ‘नवी अयोध्या’ या योजनेअंतर्गत ही मूर्ती बनवण्यात येणार आहे. धार्मिक पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. याला मान्यता देण्यासाठी राज्यपालांकडे ही योजना पाठवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडेही याची अनुमती मागण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य योजनाही राबवण्यात येणार आहेत.