कल्याण येथे १ सहस्र ५०० किलो गोमांस कह्यात !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना

कल्याण, १० ऑक्टोबर (वार्ता.) – येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोमांसाने भरलेला टेंपो घेऊन जाणार्‍या दोन धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ सहस्र ५०० किलो गोमांस कह्यात घेण्यात आले आहे. त्यांना कल्याण न्यायालयात उपस्थित केले असता ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

येथील संतोषी माता नगर परिसरात पहारा करणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक राम दिवेकर यांना एका चारचाकी टेंपोत मांस असल्याचा संशय आला. त्यांनी या वाहनाची पडताळणी केली असता गोमांस असल्याचे पहारा पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी चारचाकी कह्यात घेऊन मांसाची पडताळणी केली असता गोमांस असल्याचे निष्पन्न झाले. यावरून महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी तत्काळ गुन्हा प्रविष्ट केला असून अखलाख आसिफ शेख, इम्रान हुसेन कुरेशी या दोघांना कह्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे .

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now