नवरात्रीच्या निमित्ताने विविध ठिकाणी प्रवचन, तसेच कुंकूमार्चनाची माहिती !

बुधगाव येथे प्रवचन घेतांना सौ. सरिता चौगुले

सांगली – नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बुधगाव येथे सौ. सरिता चौगुले यांनी महिलांसाठी प्रवचन घेतले. यात महिलांनी जिज्ञासेने प्रश्‍न विचारून शंकानिरसन करून घेतले. शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे श्रीगणेश मंदिर येथे महिलांसाठी सौ. सुप्रिया घाटगे यांनी कुंकूमार्चन कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. येथे १३ महिलांची उपस्थिती होती. याचसमवेत गजलक्ष्मी नवरात्र मंडळ, गणेशनगर येथे आरती कशी करावी, तसेच कुंकूमार्चन कसे करावे याची माहिती देण्यात आली. येथे २० जिज्ञासूंची उपस्थिती होती.