पाश्चात्त्यांच्या शोधकार्याच्या तुलनेत भारतीय धर्मग्रंथांची श्रेष्ठता !

‘पाश्‍चात्त्य देशांमध्ये प्राचीन ग्रंथांचे खंडण करून लिहिण्यात लेखक आपल्या ग्रंथांचा गौरव समजतात. याचे मुख्य कारण हे आहे की, आपलेे मूळ ग्रंथ योगधारणेच्या शक्तीने साक्षात् दृष्ट (स्थुलातून दिसणार्‍या) विषयांनी ओतप्रोत भरलेले आहेत. या मार्गाने सगळ्या वस्तूंचे खरे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे योग्यांच्या स्वानुभवातून प्राप्त झाले आहे, अनुमानातून नाही. पाश्‍चात्त्य देशांमध्ये ‘इंद्रियांद्वारे उपलब्ध ज्ञान’, हेच एकमात्र साधन आहे. पाश्‍चात्त्य विद्वान ज्या विषयांमध्ये इंद्रियांद्वारे सत्य स्वरूप शोधू शकत नाहीत, त्यामध्ये इंद्रियांद्वारे प्राप्त झालेल्या त्यासंबंधी माहितीच्या आधारे अनुमान काढतात. नवनवीन शोधांनुसार हे अनुमान पालटतात. त्यांच्या ग्रंथांमध्ये वस्तूचे स्वरूप काल एक प्रकारचे असेल, तर आज आणखी वेगळ्या प्रकारचे असते. खरेतर वस्तूचे स्वरूप कधीही पालटत नाही; परंतु पाश्‍चात्त्य लोक वस्तूंमध्ये सतत होणार्‍या पालटाच्या सिद्धांताला ‘सायंटिफिक प्रोग्रेस’ असे नाव देऊन समाधानी होतात. ‘कला आणि विज्ञान यांच्या प्रत्येक शाखेत आपल्या प्राचीन ग्रंथांत मिळणार्‍या सार्‍या तत्त्वांकडे (ज्ञानाकडे) पाश्‍चात्त्य वैज्ञानिक आणि कलाकार यांचे लक्ष आतापर्यंत गेलेले नाही’, ही खरी गोष्ट आहे.’

– के. वासुदेव शास्त्री (विश्‍व संगीत अंक)