११ दोषींची फाशी जन्मठेपेत परावर्तीत ! – गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय

गोध्रा येथे कारसेवकांना ठार केल्याचे प्रकरण

कर्णावती – वर्ष २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला आग लावून ५९ कारसेवकांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने ११ दोषींची फाशीची शिक्षा रहित करून ती जन्मठेपेत परावर्तीत केली आहे. १ मार्च २०११ या दिवशी विशेष तपास पथकाच्या न्यायालयाने ३१ जणांना दोषी ठरवले होते. यात ११ जणांना फाशी, तर २० जणांना जन्मठेप अशी शिक्षा ठोठावली होती. तसेच ६३ जणांना निर्दोष ठरवले होते. गुजरात सरकारने निर्दोेष ठरवल्याच्या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.


Multi Language |Offline reading | PDF