सुदर्शन न्यूजच्या कार्यालयाबाहेर सापडलेल्या स्फोटकांविषयी गुन्हा नोंद

हिंदुत्वनिष्ठ प्रसारमाध्यमांना लक्ष्य केले जात आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घेऊन त्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवली पाहिजे !

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील सुदर्शन न्यूज या हिंदुत्वनिष्ठ वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटके सापडली होती. त्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुदर्शन वाहिनीला धमक्या मिळत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर स्फोटके सापडणे चिंताजनक घटना आहे. पोलिसांनी प्रथम कार्यालयाबाहेर सापडलेल्या साहित्याला स्फोटक म्हणण्यास नकार दिला होता. मात्र सीआयएस्एफ्चे पथक आल्यावर त्यांनी ही स्फोटके डोंगर खणण्यासाठी वापरली जात असल्याचे सांगितले.