ख्रिस्ती मिशनरी, जिहादी आणि माओवादी हिंदूंना लक्ष्य करत आहेत ! – चक्रवर्ती सूलिबेले, युवा ब्रिगेड, कर्नाटक

डावीकडून कु. भव्या गौडा, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, दीपप्रज्वलन करतांना श्री. चक्रवर्ती सूलिबेले आणि श्री. गुरुप्रसाद गौडा

बेंगळुरू – जगात एकमेकांचे हाडवैरी असणारे ख्रिस्ती मिशनरी, जिहादी, माओवादी हे भारतात एकवटून हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे चालवत असलेल्या संस्थांकडे विदेशातून भरभरून पैसा येत होता. गौरी लंकेश या नक्षलवाद्यांच्या संपर्कात होत्या. एवढेच नव्हे, तर मृत्यूपूर्वी कॉम्रेडना उद्देशून आपल्यात विकल्प नको. आपले ध्येय भिन्न आहे, असे ट्वीट केले होते. हे पहाता नक्षलवादी अथवा अशाच शक्तींनी त्यांची हत्या केली असावी, असे प्रतिपादन युवा ब्रिगेडचे नेते श्री. चक्रवर्ती सूलिबेले यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीने डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्येविषयी हिंदूंवर आरोप का ? या विषयावर जनसंवाद सभा आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद गौड, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता एन्.पी. अमृतेश, सनातन संस्थेच्या

कु. भव्या गौडा आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेला ५०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF