मुसलमान महिलांनी केस कापू नये ! – दारूल उलुमचा फतवा

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील देवबंद दारूल उलूमने मुसलमान  महिलांसाठी काढलेल्या नव्या फतव्यामध्ये महिलांना भुवया कोरणे (आयब्रो करणे) आणि केस कापणे याला अवैध ठरवत त्यावर बंदी घातली आहे. इस्लाममध्ये महिलांसाठी १० प्रतिबंध आहेत. यात केस कापणे आणि आयब्रो करणे यांचा समावेश आहे, असे या फतव्यात म्हटले आहे.

माझी पत्नी आयब्रो आणि केस कापू शकते कि नाही, अशी सहारनपूरमधील एका व्यक्तीने दारूल उलूमच्या फतवा विभागाकडे विचारणा केली होती. त्यावर वरील उत्तर देण्यात आले. महिलांचे केस हे त्यांचे सौंदर्य आहे. जोपर्यंत केस कापण्याला काही पर्याय उरला नसेल, अशा वेळी नाइलाजास्तव केस कापले तर चालू शकते, असेही या फतव्यात म्हटले आहे.