धाराशीव जिल्ह्यात ५०० किलो गोमांस कह्यात

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करणारी घटना !

धाराशीव – ४ ऑक्टोबरला रात्री भूम परांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोगल मशीदच्या पाठीमागे अजीज कुरेशी यांच्या घराच्या समोर एका पत्र्याच्या शेडमध्ये गायी कापून गोमांस गाडीत भरण्यात येत आहे, अशी माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली. स्वामी यांनी उस्मानाबाद पोलीस नियंत्रण कक्ष आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सर्व माहिती देऊन कारवाईची मागणी केली. तेव्हा थोड्याच वेळात परांडा पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून एका पिक वाहनामध्ये गोमांस भरून जात असतांना गौस खाज कुरेशी आणि मोबिन इब्राईन कुरेशी अशा दोघांना टेम्पो आणि गोमांसासहित कह्यात घेतले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा प्रविष्ट करून गोमांसाची विल्हेवाट लावण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF