संभाजीनगर येथील अब्दुल रशीद जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत पोलीस निरीक्षकाचे निलंबन

जुगार अड्डा प्रकरणात पोलिसांचा समावेश असणे लज्जास्पद !

संभाजीनगर – काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते अब्दुल रशीद यांच्या नावे रेल्वे स्थानकावर असलेल्या जुगार अड्ड्यावर ३ ऑक्टोबरला धाड टाकण्यात आली. या प्रकरणी वेदांतनगर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादाराव शिंगारे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आणि उपायुक्त विनायक ढाकणे यांसह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना आगाऊ सूचना (नोटीस) पाठवण्यात आल्या आहेत. (केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)

अधिकार्‍यांनी अड्ड्यावर धाड टाकल्यावर एका कर्मचार्‍याने त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली. एका वरिष्ठ अधिकार्‍याने काही पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. (प्रत्येकच क्षेत्रात एकमेकांना वाचवणारे भ्रष्ट अधिकारी आहेत. यावरूनच हिंदु राष्ट्राची आवश्यकता लक्षात येते. हिंदु राष्ट्रात प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ कर्मचारीच सेवेत असतील ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF