मेट्रोच्या कामामुळे इमारत कोसळली, तर उत्तरदायी कोण ? – मुंबई उच्च न्यायालय

न्यायालयाला हे का सांगावे लागते ? मेट्रोच्या कामाचे दुष्परिणाम शासन आणि रेल प्राधिकरण यांना लक्षात येत नाहीत का ?

मुंबई – मेट्रोच्या कामामुळे एखादी इमारत कोसळली, तर त्याला उत्तरदायी कोण?, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने ५ ऑक्टोबरला एका सुनावणीच्या वेळी मेट्रो रेल प्राधिकरणाला केला आहे. मेट्रो प्राधिकरणाने आपला अहंकार कमी करावा, मी म्हणू तीच पूर्व दिशा अशी भूमिका घेऊ नये, असेही न्यायालयाने पुढे म्हटले आहे. शिवाय न्यायालयाने नेमलेल्या समितीसोबत काम करण्याचा आदेशही मेट्रो प्राधिकरणाला दिला आहे. भविष्यात फोर्ट परिसरातील जुन्या इमारतींना धोका पोहोचू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले आहेत.

कुलाब्यातील रहिवाश्यांनी मेट्रो-३ च्या कामाविषयी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील वक्तव्ये केली.


Multi Language |Offline reading | PDF