भारतातील ६० टक्के गर्भपात असुरक्षित ! – जागतिक आरोग्य संघटना

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत भारताने केलेली प्रगती !

नवी देहली –  गर्भपाताला कायदेशीर मान्यता असलेल्या जगभरातील अनेक देशांमध्ये सुरक्षित गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे; मात्र अपुर्‍या वैद्यकीय सुविधा, रुग्णालयांचा उदासीन कारभार आणि जागरूकतेचा अभाव यांच्यामुळे भारतातील जवळपास ६० टक्के गर्भपात असुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

१. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०१० ते २०१४ या काळात जगभरात ५ कोटी ५७ लाख गर्भपात झाले. यामधील ३ कोटी ६ लाख गर्भपात सुरक्षित होते, तर १ कोटी ७१ लाख गर्भपात अल्प सुरक्षित होते. उर्वरित गर्भपात अधिक असुरक्षित होते.

२. जागतिक आरोग्य संघटनेने गटमेकर या संस्थेबरोबर जगभरात सर्वेक्षण केले होते. यामधून विविध देशांमधील गर्भपाताच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला होता. गर्भपात कितपत सुरक्षित आहेत, याची पडताळणी यातून करण्यात आली. यामध्ये गर्भपातावर अनेक निर्बंध असलेल्या ६२ देशांमधील असुरक्षित गर्भपातांचे प्रमाण ७५ टक्के असल्याचे आढळून आले, तर गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिलेल्या ५७ देशांमधील असुरक्षित गर्भपातांचे प्रमाण केवळ १३ टक्के इतके आहे. भारतात गर्भपाताला कायदेशीर मान्यता असूनही देशातील असुरक्षित गर्भपातांचे प्रमाण अतिशय जास्त आहे.

२. गर्भपातासाठी प्रशिक्षित डॉक्टर, साहाय्यक कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असे घडल्यास सुरक्षित गर्भपातांचे प्रमाण वाढेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. सुरक्षित गर्भपातांचे प्रमाण वाढवायचे असल्यास धोरणात्मक पालट करून त्याची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठी सरकारला तातडीने पावले उचलून एमटीपी (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी) कायद्यात सुधारणा कराव्या लागतील, असे या क्षेत्रातील तज्ञांनी म्हटले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now