सनातन हिंदु राष्ट्रासाठी आदि शंकराचार्यांप्रमाणे केरळमधून कार्याला प्रारंभ करण्याची आवश्यकता !

भाजपमधील केवळ योगी आदित्यनाथच असे म्हणतात !

कन्नूर (केरळ) – जेव्हा देशामध्ये धर्म आणि संस्कृती यांचे हनन करण्यासाठी विदेशी घुसखोर आले, तेव्हा आदि शंकराचार्य यांनी हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी कार्य केले. आता पुन्हा तीच वेळ आली असून त्यांच्याप्रमाणे हिंदु धर्माच्या रक्षणासाठी, हिंदुत्वाला पुनरूज्जीवित करण्यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. ते भाजपकडून केरळमध्ये संघ आणि भाजप यांच्या हत्यांच्या विरोधात चालू असलेल्या जनसुरक्षा यात्रेच्या वेळी बोलत होते. केरळमधील कम्युनिस्ट विचारसणीचा योगी आदित्यनाथ यांनी विदेशी विचारसरणी म्हणून उल्लेख केला.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पहाता जिहादी आतंकवाद आणि साम्यवाद यांचा अंत जवळ आला आहे. माकपने केरळला जिहादी आतंकवादामध्ये ढकलले आहे. केरळमध्ये भाजपचे सरकार येऊन हिंसाचाराचा, आतंकवादाचा अंत होईल.

(म्हणे) ‘पं. नथुराम गोडसे यांना देव मानणार्‍यांकडून शांतता शिकवण्याची आवश्यकता नाही !’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळमध्ये माकपकडून होणार्‍या हत्या पहाता त्यांची दुसर्‍यांवर टीका करण्याचीही लायकी नाही !

तिरुवनंतपुरम् (केरळ) – पं. नथुराम गोडसे यांना देव मानणार्‍यांनी आम्हाला शांततेच्या गोष्टी शिकवण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी राज्यात भाजपकडून काढण्यात येत असलेल्या जनसुरक्षा यात्रेवर व्यक्त केली आहे. त्यांनी भाजपवर राज्यातील शांतता भंग करण्याचाही आरोप केला. ‘भाजप केंद्रातील शक्तीच्या आधारे राज्यातील धर्मनिरपेक्षता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोपही त्यांनी केला. (केरळमध्ये धर्मनिरपेक्षता असेल, तर ती नष्ट होईल ! तेथे केवळ धर्मांधांचेच राज्य चालते ! – संपादक) विजयन् म्हणाले की, आम्हाला कोणी घाबरवू शकत नाही. हत्या आणि आक्रमण करणार्‍यांशी संघाच्या वरिष्ठ नेत्यांचे संबंध आहेत.


Multi Language |Offline reading | PDF