परळ येथील केईएम् रुग्णालयाला अद्यापही ‘एम्स’चा दर्जा नाही

मुंबई – परळ येथील केईएम् रुग्णालयाला अद्यापही ‘एम्स’चा दर्जा किंवा रुग्णालय विस्तारण्यासाठी कोणतेही आर्थिक साहाय्य मिळालेले नाही. वर्ष २००६ च्या रेल्वे बॉम्बस्फोटानंतर तत्कालिन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, पंतप्रधान मनमोहन सिंह तसेच अन्य मंत्र्यांनीही साहाय्याचे आश्‍वासन दिले होते. (केईएम् रुग्णालय हे मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी असून सर्वसामान्यांना परवडणारे आहे. त्यामुळे शासनाने रुग्णालयाला आर्थिक साहाय्य देण्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक) काही दिवसांपूर्वी झालेल्या एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रुग्णालयाकडून घायाळांना तातडीने सेवा पुरवली जात होती; मात्र भेट देण्यासाठी येत असलेल्या मंत्र्यांमुळे, त्यांच्यासह आलेल्या लोकांमुळे डॉक्टरांना त्यांच्या कामात अडथळे येत होते. भेट देण्यासाठी येणारे तसेच छायाचित्रकार बूट घालून रुग्णालयात हवे तसे फिरत असल्याने त्यातून संसर्ग होण्याची भीतीही डॉक्टरांनी व्यक्त केली होती.


Multi Language |Offline reading | PDF