मेक्सिकोतील ख्रिस्ती धर्मगुरूला ३० अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे मान्य करूनही चर्चने त्याला दोषमुक्त ठरवले

जोस गार्सिया अतौल्फो

मेक्सिको सिटी – दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील ख्रिस्ती धर्मगुरु जोस गार्सिया अतौल्फो हा एड्स या दुर्धर आणि संसर्गजन्य रोगापासून बाधित झाला असतांनाही त्याने ५ ते १० वर्षे वयोगटाच्या ३० मुलींवर बलात्कार केला. तसेच याची त्याने स्वीकृती देऊनही मेक्सिकोच्या कॅथोलिक चर्च व्यवस्थापनाने त्याला दोषमुक्त केल्याची माहिती एका स्पॅनिश भाषेतील वृत्त संस्थेच्या संकेतस्थळाने प्रसारित केली आहे. (अशी वृत्ते भारतातील प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत; कारण अशी वृत्ते प्रसारित केल्यावर ते निधर्मी आणि पुरोगामी ठरणार नाहीत ! – संपादक)

१. अतौल्फो हा दक्षिण मेक्सिकोतील ओक्साका राज्यात बहुसंख्य मूळ रहिवासी असलेल्या भागात कार्यरत होता. त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही; कारण या भागात कॅथोलिक चर्च व्यवस्थापनाचा मोठा प्रभाव अस्तित्वात आहे.

२. अतौल्फो याने ३० मुलींवर बलात्कार केल्याचे मान्य केले असले तरीही त्यातील केवळ २ मुलींच्या पालकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यातील एका मुलीच्या आईने या प्रकरणी पोप यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता ‘व्हॅटीकनने संबंधित धर्मगुरूस दोषमुक्त केल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे’, असे सांगून तिची विनंती अमान्य केली.

३. वर्ष २०१३ मध्ये सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी कारभार सांभाळल्यावर लगेच घोषणा केली होती की, ज्या धर्मगुरूंवर मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत त्यांना निष्कासित करण्यात येईल; मात्र त्यानंतरही अमेरिकेसह अनेक देशात असे गुन्हे घडतच आहेत.

४. मेक्सिकोत वर्ष २००४ मध्ये मार्सियल मासिएल या धर्मगुरूने अनेक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केले. तसेच ३ महिलांशी शारीरिक संबंध ठेऊन त्यातून मार्सियल ६ मुलांचा पिता झाल्याची घटना व्हॅटीकनच्या अद्याप विचाराधीन आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now