नाशिक येथे रिसॉर्टवर टाकलेल्या धाडीत बीभत्स नृत्य करणार्‍या सात तरुणींसह १५ जणांना अटक

अनैतिकतेला खतपाणी देणार्‍या रिसॉर्टवर बंदीच हवी !

नाशिक – येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर इगतपुरी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बीभत्स नृत्य आणि मेजवानी करणार्‍या सात तरुणींसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बायोसाईड आस्थापनाचे भोर तालुक्यातील दोन व्यवस्थापक, संगमनेर येथील एक व्यवस्थापक आणि नाशिक येथील एक संचालक असे चार मुख्य अधिकारी, तसेच विविध जिल्ह्यांतील वितरक यांचाही समावेश आहे. डीजेंनाही पोलिसांनी कह्यात घेतले. या सर्वांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. सात तरुणींना सुधारगृहात पाठवण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF