डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – शिवसेना महिला आघाडीची मागणी

कोल्हापूर येथील मेंदूतज्ञांकडे पदवी प्रमाणपत्र नसल्याचे प्रकरण

कोल्हापूर – डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्याकडे मेंदूतज्ञ होण्याकरिता आवश्यक डिग्री उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले; पण त्यांना पदवी प्राप्त झालेली नाही. त्यांनी प्राईम हॉस्पिटल या त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये प्रविष्ट होणार्‍या रुग्णांना मेंदूतज्ञ (न्युरोसर्जन) असल्याची बतावणी करून शेकडो चुकीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या चुकीच्या शस्त्रक्रिया आणि उपचार यांमुळे अनेक निष्पाप रुग्णांचा नाहक बळी गेला असून डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करावा, अशी मागणी शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. संजय मोहिते यांना करण्यात आली. या वेळी चुकीच्या उपचाराचे बळी पडलेल्या नातेवाइकांनी त्यांचे गार्‍हाणे पोलीस अधीक्षकांकडे मांडले.

डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेने मृत्यू पावलेल्या तेजस या तरुणाच्या वडिलांनी गेल्या आठवड्यात आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार राजन साळवी यांच्यासमवेत जिल्हा पोलिसांकडे वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा आणि आर्थिक लुबाडणुकीचा गुन्हा प्रविष्ट करावा, असा तक्रार अर्ज दिला होता. तीन रुग्णांच्या नातेवाइकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now