ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी

व्हीएन्ना (ऑस्ट्रिया) – ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे, तसेच इमारतींमध्ये चेहरा लपवण्यात येणारे कपडे परिधान करणे या प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे. यात काही अटींद्वारे सुटही देण्यात आली आहे. यात विदुषकाची वेशभूषा, वैद्यकीय विभागाचे मास्क आणि थंडीच्या दिवसांतील स्वेटर सारखे कपडे यांना सूट देण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्‍याला १५० युरोचा (११,५०० रू.) दंड ठोठावण्यात येणार आहे. युरोपमधील फ्रान्स, स्पेन सारख्या काही देशांनी यापूर्वीच बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे.


Multi Language |Offline reading | PDF