अन्सारींचा जिहादी चेहरा उघड झाला !

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पदावरून निवृत्त होतांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘या देशातील मुसलमान असहिष्णुता, भय आणि दुजाभाव यांचे शिकार होत आहेत’, असे वक्तव्य केले. पुणे येथील ‘हिंदुबोध’ मासिकाचे संपादक श्री. विवेक सिन्नरकर यांनी अन्सारी यांचा खरपूस समाचार घेत या वक्तव्याच्या निमित्ताने जिहादी तोंडवळा उघड झाल्याचे म्हटले आहे. श्री. सिन्नरकर यांनी या संदर्भात लिहिलेला लेख आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. हमीद अन्सारी हे नुकतेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या केरळमधील आतंकवादी विचारसरणीच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही उपस्थित राहिले होते. या धर्मांधांना कितीही मोठे पद दिले, तरी ते अस्तनीतील सापाप्रमाणे डंख मारतातच !

धर्मांध आणि त्यांचे पाळीव नेते भारताला सहिष्णुता शिकवत आहेत, ही शोकांतिका !

भारतीय इतिहासामध्ये गेल्या सहस्रो वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. जगात हिंदुस्थानची एक सामर्थ्यशाली आणि खंडप्राय देश म्हणून ख्याती होती. सोन्याचा धूर निघत होता एवढे वैभवसंपन्न आपले राष्ट्र होते. अध्यात्म, धर्मशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, वास्तूकला, मूर्तीकला, संगीत, विज्ञान, रसायनशास्त्र यांसह ४ वेद, उपनिषदे, पुराणे, ६ शास्त्रे, ६४ विद्या यांनी परिपूर्ण समृद्ध जीवनप्रणाली म्हणजे हिंदु धर्म ! सहिष्णुता ही भारताची ओळख होती आणि आजही आहे. हिंदु धर्मासह बौद्ध, जैन, शीख आदी पंथ येथे स्थापन झाले आणि वाढले. हिंदुस्थान ही धर्मभूमी आणि कर्मभूमी आहे. जे जे जे या विशाल हिंदु धर्माच्या आसर्‍याला आले, त्या सर्वांचे भारताने रक्षण केले. भारतियांनी दुर्जनशक्ती आणि आसुरीशक्ती यांच्याविरुद्ध लढाई केली आणि या शक्तींना रोखले. दुर्दैवाने भारतात बाहेरून आलेल्या धर्मांधांनी हिंदूंच्या प्रत्येक अस्मितेचा द्वेष करून संघर्षाला जिहादचे भेसूर रूप दिले. ज्या जिहादी आतंकवाद्यांनी संपूर्ण जग वेठीस धरले आहे, ते धर्मांध आणि त्यांचे पाळीव नेते भारताला सहिष्णुता शिकवत आहेत, ही खरी शोकांतिका आहे.

हिंदु धर्माची महानता

ज्या वेळी मध्य आशिया, युरोप, अमेरिका येथे विविध टोळ्या, वनवासी समूह अर्धवस्त्र अवस्थेत पशूवत जीवन जगत होते, त्या वेळी हिंदुस्थानात ज्ञानगंगा दुथडी भरून वहात होती. विशाल नगरे, राज्यव्यवस्था, नीतीशास्त्र, राज्यप्रणाली, शिक्षण, विद्यापिठे , स्थापत्यशास्त्र, हिरे, मोती, सोने, रेशीम प्रक्रिया वा मसाल्याचे पदार्थ, शेती प्रक्रिया, उद्योग यांची जगात ख्याती होती. भारतीय न्यायव्यवस्था, युद्धशस्त्रे, युद्धशास्त्र, योग, तंत्रविद्या, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी पूर्व, पश्‍चिम, उत्तर आणि मध्य जगातील ज्ञानपिपासू साधक भारतभूमीत येत होते. इथले ज्ञान भरभरून नेत होते. भारताबरोबर संबंध जोडण्यासाठी सर्व देश उत्सुक असत.

१ सहस्र २०० वर्षांपूर्वी ही परिस्थिती पालटून धर्मांध टोळ्यांनी धर्मवेडेपणातून आणि  सत्तापिपासू वृत्तीने भारत भूमीवर आतंकवादी आक्रमणे करून भारताला लुटले. हिंसाचार, स्वैराचार, धर्मांधता अशी असहिष्णुता अन् रानटी क्रूरता म्हणजे धर्मांधांची आक्रमणे ! त्याने आपल्या इतिहासाची पाने रक्ताळली गेली. धर्मांतरे, घातकी हत्या, पारतंत्र्य, लूट, अब्रूचे धिंडवडे काढत माणसांसह मंदिरे, राजवाडे, गावे, नगरे भ्रष्ट केली गेली.

हिंदुत्वाच्या सहिष्णुतेची परीक्षा नियतीने पाहिली. धर्मांध असहिष्णुतेच्या वादळात सर्व हिंदुस्थान ‘दारुल इस्लाम’ (इस्लामी राजवट असलेली भूमी) बनतो कि काय, अशी दहशत धर्मांध आक्रमकांनी निर्माण केली. सुदैवाने हिंदूंनी १ सहस्र २०० वर्षे अखंड लढे देऊन हिंदु धर्म आणि हिंदुस्थान खंडित का होईना; पण आज वाचवला आहे. हिंदूंनी धर्मांधांच्या जंगली असहिष्णुतेला भारतीय संस्कृतीची वेसण घालून लोकशाही मार्गाने मानवतेचा पाठ शिकवला. बलीदान, त्याग, धर्मयुद्ध, राष्ट्रप्रेम, धर्मतेज यांचा अतुलनीय सोनेरी इतिहास भारतीय नरविरांनी रचून हिंदु राष्ट्र वाचवले. संघटित प्रयत्नांचा अभाव, फुटीरता, परस्पर द्वेष आणि सार्वभौम राष्ट्र अन् अखंड हिंदु राष्ट्राचे विस्मरण; या प्रमुख दोषांनी हिंदुस्थानची शकले झाली; पण धर्म आणि संस्कृती आज टिकून राहिली आहे. सहिष्णुतेचे पोवाडे आजही आमचेच गायले जातात.

धर्मांधांची ‘दारुल इस्लाम’ची रानटी भूक !

इस्लामी राजवटीत लोकांनी पराकोटीची असहिष्णुता अनुभवली. हिंसा, धर्मांतर, अपहार, अत्याचार, दंंगे, गोहत्या, मंदिरे अन् अस्मिता यांचे धिंडवडे हे गेली शेकडो वर्षे हिंदूंनी सोसले आहे. आजही धर्मांधांची ‘दारुल इस्लाम’ची (संपूर्ण भारत आणि जग इस्लाममय करणे) रानटी भूक संपलेली नाही. धर्मांधांनी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करून रक्ताचे पाट वहावले. काश्मीरचे लचके तोडून फाळणीच्या जखमा ताज्या ठेवून दहशत कायम राखली. ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’, या दुष्ट वासनेने प्रत्येक क्षेत्रात धर्मांधांसाठी स्वतंत्र वाटा मागून देश कुरतडून ठेवला जात आहे.

हमीद अन्सारी यांचा धर्मांध तोंडवळा !

याचे ताजे उदाहरण म्हणजे माजी उपराष्ट्रपती मियाँ हमीद अन्सारी ! उपराष्ट्रपतीपद दहा वर्षे उपभोगून हमीद अन्सारींसारखे अस्तनीतील साप म्हणतात, ‘या देशातील मुसलमान असहिष्णुता, भय आणि दुजाभाव यांचे शिकार होत आहेत.’ हे तेच अन्सारी ज्यांनी कधी ‘वन्दे मातरम्’ म्हटले नाही, भारतीय राष्ट्रध्वजाला नमन केले नाही, मुस्लिम लीगची धर्मांध परंपरा मनात ठेवून अलीगढ विद्यापिठात विशिष्ट पठडीतील पदव्या घेतल्या, भारतीय उच्चायुक्त कार्यालयात सेवेच्या नावाखाली सर्व मेवा खाल्ला, परराष्ट्र सेवेत भारतीय सन्मानाची एकही कामगिरी न करता केवळ मुसलमान आणि गांधी परिवार यांच्या मागे लपून ४० वर्षे मुस्लिम प्रतिमा जपली आणि निवृत्तीच्या पूर्वसंध्येला जाणीवपूर्वक मुलाखत देऊन स्वतःचा धर्मांध तोंडवळा दाखवला. ही वेळ बरोबर साधण्याची हातोटी त्यांनी परराष्ट्र खात्यातील अनुभवाने मिळवली असावी. अन्सारी यांनी त्यांच्या वक्त्यव्यातून त्यांचा जिहादी तोंडवळा उघड केला आहे.

सुसंस्कृत भारतीय मुसलमान आणि जिहादी मुसलमान यांतील भेद जाणा !

आज भारतात मुसलमानांना हिंदूंएवढेच अधिकार आहेत. मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये हिंदू असुरक्षित आहेत, तर हिंदूबहुल भागात मुसलमान अधिक सुरक्षित आहेत, असे निरीक्षण आहे. मुंबईसारख्या महानगरात मुसलमान भर चौकात जाळपोळ करतात, हुतात्मा स्मारकाची विटंबना करतात, पोलिसांची वाहने जाळून महिला पोलिसांच्या वर्दीला हात घालतात, पोलिसांची शस्त्रे खेचून घेतात, ‘गळ्यावर तलवार ठेवली, तरी वन्दे मातरम् म्हणणार नाही’, असे म्हणतात, राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देतात, तरी त्यांना कोणी रोखत नाही आणि केवळ त्याचा निषेध व्यक्त केला, तरी हिंदू असहिष्णू ठरतात ?

काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करून, अतिरेक्यांना संरक्षण देणारे, लष्करी कारवाईत अडथळे आणणारे धर्मांध युवक उजळ माथ्याने भारताचा झेंडा जाळतात आणि पाकिस्तानचा झेंडा फडकावतात. असे भरकटलेले युवक स्वातंत्र्यवीर म्हणून काश्मिरी धर्मांध नेत्यांकडून आणि पाककडून सर्व प्रकारचे साहाय्य मिळवतात. आज देशात लष्करी अधिकार्‍याने जीपला एका दंगेखोराला बांधून मोठी मनुष्यहानी टाळणे, ही गुंडगिरी ठरत आहे. सैनिकांवर दगडफेक करणे, ही स्वातंत्र्याची अभिव्यक्ती ! ‘भारत के हो तुकडे हजार’ म्हणणारे विचारवंत ! पोलिसांवर आक्रमणे करणारे धर्मवीर ! तर, दुसरीकडे, गायींना वाचवणारे भगवे आतंकवादी ! अतिरेक्यांचा खात्मा करणारे काफीर ! इस्लामी आक्रमकांचे धडे अभ्यासक्रमातून वगळणे, हे शिक्षणाचे भगवेकरण आणि अतिरेक्यांना मारणे म्हणजे मानवाधिकारांची गळचेपी ! हेच आज बौद्धिक पुढारलेपणाचे लक्षण असल्याचे पसरवले जात आहे.

अन्सारी यांनी निवृत्तीनंतर केलेली टिप्पणी किती ढोंगीपणाची आहे, हे आता जनता जाणते. हमीद अन्सारी यांना मोठे पद देऊनसुद्धा ते आज जनमानसातून उतरले, तर मुसलमान असूनसुद्धा माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ते परमभाग्य प्राप्त केले. त्यांनी हिंदु संस्कृतीची नाळ जपली. श्रीमद्भगवद्गीतेचा आदर करून स्वतःला भारतीय संस्कृतीचे पाईक मानले. भारताला महाशक्ती बनवण्याचे स्वप्न त्यांनी युवा पिढीला दिले. देशसेवा केली आणि राष्ट्र्रपतीपदाची प्रतिष्ठा त्यांनी अखेरपर्यंत राखली. निवृत्तीनंतरही ते युवा पिढीला घडवण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या तासापर्यंत कर्मयोग्याप्रमाणे झटले. हा सुसंस्कृत भारतीय मुसलमान आणि जिहादी मुसलमान यांतील भेद आहे.


Multi Language |Offline reading | PDF