परळ-एलफिन्स्टन दुर्घटनेप्रकरणी रेल्वे अधिकार्‍यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट

उच्च न्यायालयाकडे हत्येचा गुन्हा नोंदवण्याची याचिकेद्वारे मागणी

मुंबई – परळ-एलफिन्स्टन पुलावरील दुर्घटनेच्या प्रकरणी रेल्वे अधिकार्‍यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली असून प्रदीप भालेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

१. याचिकेत म्हटले आहे की, या घटनेला रेल्वे अधिकार्‍यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना झाली.

२. यासह पुलावरील अतिक्रमणाच्या विरोधातही कारवाईची मागणी आणि पूल दुर्घटनेकडे न्यायालयाने लक्ष ठेवावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

३. ३ ऑक्टोबरला या प्रकरणी ठाणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रहास तावडे, ज्येष्ठ अधिवक्ता व्ही.पी. पाटील यांच्या वतीने आणखी एक याचिका प्रविष्ट करणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF