महालक्ष्मीची नवव्या दिवशी भवानी रूपात सालंकृत पूजा

कोल्हापूर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबरला करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी देवीची श्री भवानी माता रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. सर्वश्री रामप्रसाद ठाणेकर, पराग ठाणेकर, उमेश उदगावकर यांनी पूजा बांधली. छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देतांना भवानी असे रूप पूजेतून साकारण्यात आले. खंडेनवमीनिमित्त देवीच्या खजिन्यातील पारंपरिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. देवीचा घटही पारंपरिक पद्धतीने विधीवत् पूजा करून हलवण्यात आला. गेल्या ९ दिवसांत सोळा लक्ष भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिरास भेट दिली.