स्वतःसमवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा सण ‘दसरा’ !

दसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदेला देवीचे आवाहन करून रामनवमीप्रमाणे नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वतीस्वरूपी भगवतीचे पूजन, नवमीच्या दिवशी शस्त्रगर्भा देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शमीचे अन् शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावाच्या वेशीबाहेर जाऊन करायचे असते. ‘गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून सुखसमृद्धी आणू’, असा यामागचा अर्थ आहे. सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्रे, अस्त्रे, सैन्य यांचे प्रदर्शन करून सर्वांना सोने वाटावयाचे असते.


Multi Language |Offline reading | PDF