दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देण्यामागील कारणे

मुळाशी आकृष्ट झालेल्या निर्गुण तेजोलहरी पानांमध्ये कार्यरत होत असणे

ब्रह्मांडातील निर्गुण तेजोलहरी आकृष्ट होऊन आपट्याच्या झाडाच्या मुळाशी सामावून रहातात. तेजतत्त्वाचे अधिष्ठान लाभल्यामुळे कालांतराने त्या लहरी झाडाच्या पानांमध्ये कार्यरत होतात. या तेजोलहरी इच्छा-क्रिया शक्तीशी संबंधित असतात.

आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण अधिक असणे आणि सूर्यकिरणांचा प्रभाव पडल्यावर त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होणे

अन्य वृक्षांच्या तुलनेमध्ये आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण अधिक असते. ज्या वेळी या पानांवर सूर्यकिरण पडतात, त्या वेळी त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होण्यास आरंभ होतो. ही पाने वाळली, तरी त्यांचा जो मूळ रंग असतो, त्यामध्ये अन्य वृक्षांच्या पानांच्या तुलनेत अधिक पालट होत नाही. पानांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोलहरींचे वातावरणामध्ये दीर्घकाळ वास्तव्य असते.

‘सोन्याचे प्रतीकात्मक रूप’ म्हणून आपट्याच्या पानाचा वापर करण्यामागील कारण

‘सोने’ या धातूमध्ये तेजतत्त्वाची स्पंदने कार्यरत असतात, त्याप्रमाणे आपट्याच्या पानामध्येही अंशात्मक स्तरावर तेजतत्त्वाची स्पंदने कार्यरत असतात. त्यामुळे ‘सोन्याचे प्रतीकात्मक रूप’ म्हणून याचा वापर केला जातो.


Multi Language |Offline reading | PDF