हे नारी, घेऊनी कितीदा शस्त्र करी, लढलीस होऊनी रणरागिणी ।

हे नारी, घेऊनी कितीदा शस्त्र करी, लढलीस होऊनी रणरागिणी ।

नाहीस तू अबला नारी, तू तर शक्तीस्वरूपिणी ।

घेऊनी कितीदा शस्त्र करी, लढलीस होऊनी रणरागिणी ॥ धृ. ॥

तूच दुर्गा, तूच काली, जगदंबा तू, आई भवानी ।

असुरदमन करण्यास्तव, सिद्ध सदा तू, शस्त्रधारिणी ।

दैत्य दुष्ट छळता जगता, क्रुद्ध तू, रूद्ररूपिणी ॥ १ ॥

पुराणे तव पराक्रमाच्या, सुंदर गाथा गाती ।

चंड-मुंड तू वधी कैसे, ऋषिगण सारे वदती ।

शुंभ-निशुंभाची वधकर्ती तू, महिषासुरमर्दिनी ॥ २ ॥

इतिहास तव वीरश्रीचे, पोवाडे गातो ।

किल्ल्यामधूनी तलवारीचा, टणत्कार घुमतो ।

तूच ना ती वीरांगना, झाशीची राणी ॥ ३ ॥

कलियुगी आज दुष्प्रवृत्तींचा, उद्रेक बहु झाला ।

सदाचरणी, धर्माचरणी, मनुष्य लुप्त झाला ।

स्त्री पहा तू, धर्मशक्तीचे अंगी बळ आणूनी ॥ ४ ॥

– अधिवक्त्या (सौ.) श्रुती भट, अकोला (२१.९.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF