नवादा (बिहार) येथे धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

बिहारच्या सरकारमध्ये भाजप सहभागी असतांना अशा प्रकारची घटना होणे, हिंदूंना अपेक्षित नाही !

• हिंदूंच्या धार्मिक उत्सवात धर्मांध आक्रमण करतात, तेव्हा प्रसारमाध्यमे मौन बाळगून अशा बातम्या दडपतात; मात्र एखाद्या चर्चवर किंवा मशिदीवर साधा दगड जरी भिरकावण्यात आला, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी होते !

• धर्मांधांच्या आक्रमणात श्री दुर्गादेवीची मूर्ती, श्री गणेशमूर्ती आदींचे रक्षण करू न शकणारे हिंदू राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण काय करणार !

• बिहार भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? धर्मांध अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कसे करू शकतात, हे पुरोगामी आणि निधर्मीवादी सांगतील का ?

(छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

नवादा (बिहार) – येथील बलिया बुजुर्ग गावामध्ये धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना २७ सप्टेंबरला घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. येथे सप्तमीच्या दिवशी मूर्तीची स्थापना करण्यासाठी मिरवणुकीनेे ही मूर्ती आणली जात होती. त्या वेळी भारत में रहना है तो वन्दे मातरम् कहना होगा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. याचा धर्मांधांना राग आला आणि त्यातून या मिरवणुकीवर आक्रमण करून मूर्तीची तोडफोड करण्यात आली. यानंतर येथे झालेल्या हिंसाचारात एक पोलीस घायाळ झाला. (धर्मांधांकडून नेहमीच मार खाणारे पोलीस हिंदूंचे रक्षण कसे करणार ? – संपादक) या घटनेची माहिती सर्वत्र पसरून तणाव निर्माण होऊ नये, यासाठी येथील इंटरनेट सेवा राज्याच्या गृह विभागाच्या आदेशाने बंद करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF