तहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्या विरोधातील बलात्काराचा आरोप निश्‍चित

सहकारी महिला पत्रकारावरील बलात्कार प्रकरण

संतांवर केवळ आरोप झाल्यावर त्यांच्या वैयक्तिक गोष्टींचेही अवडंबर करून बातमी दाखवणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष पत्रकार आणि वृत्तवाहिन्या तेजपाल यांच्याविषयी तसेच प्रसारण करतील का ?

म्हापसा, २८ सप्टेंबर – तहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी सहकारी पत्रकार महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी गोव्यातील म्हापसा येथील सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. या खटल्याची सुनावणी आता चालू होणार आहे.

वर्ष २०१३ मध्ये गोव्यात झालेल्या थिंक फेस्ट या विचार महोत्सवाच्या वेळी एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी सहकारी पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या संदर्भात पोलिसांनी चौकशी करून तेजपाल यांच्या विरोधात १७ फेब्रुवारी २०१४ या दिवशी आरोपपत्र दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार बलात्काराच्या प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर ८ मासांच्या आत आरोप निश्‍चित होऊन खटल्यावरील सुनावणी चालू होणे आवश्यक आहे; मात्र या आरोपनिश्‍चितीस तेजपाल यांनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्याने सुनावणीस बराच विलंब झाला. तेजपाल यांची आक्षेप याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपिठाने बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्या आरोप निश्‍चितीवर बंदी घालण्यास नकार दिला होता. त्यानंतर म्हापसा सत्र न्यायाधिशांनी तेजपाल यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५४ (ए), ३५४ (बी) या लैंगिक शोषणाच्या कलमांखाली, ३७६, ३७६ (२)(के), ३७६ (२)(एफ्) या बलात्कारासाठीच्या कलमांखाली, तसेच ३४१ आणि ३४२ (कोंडून ठेवणे) या कलमांखाली आरोप निश्‍चित केला आहे. एका अधिकारी व्यक्तीने पदाचा अपलाभ उठवून सहकारी महिलेवर अत्याचार केल्याच्या कलम ३७६ (२)(एफ्) या कलमाखाली पहिल्यांदाच गोव्यात एखाद्या व्यक्तीवर आरोप निश्‍चित झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF