काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून घरात घुसून सैनिकाची हत्या

काश्मीरमध्ये असुरक्षित सैनिक !

जनरल बिपीन रावत पाकने कारवाया थांबवल्या नाहीत, तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, अशी पाकला चेतावणी देतात; मात्र दुसरीकडे पाकचे आतंकवादी भारतीय सैनिकांना घरात घुसून मारतात ! रावत यांच्या आधीच आतंकवादी कृती करतात !

श्रीनगर – जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील हाजीन येथे रहाणारे सीमा सुरक्षा दलाचे सैनिक रमीझ अहमद पारे (वय ३० वर्षे) यांची त्याच्या घरात घुसून हत्या केली. रमीझ यांचे घर हाजीनमधील पारे मोहल्ल्यात आहे. आतंकवाद्यांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात रमीझ यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमीझ यांचे वडील, भाऊ आणि चुलती या आक्रमणात गंभीररित्या घायाळ  झाले. या तिघांपैकी रमीझ यांच्या चुलतीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. रमीझ राजस्थानात सेवा बजावत होते. तेथून ते सुट्टीवर आले होते.


Multi Language |Offline reading | PDF