शिक्षणाची दयनीय स्थिती असणार्‍या जागतिक देशांच्या सूचीमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर !

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत भारताने केलेली प्रगती !

नवी देहली – जागतिक बँकेकडून जगातील शिक्षणाची दयनीय स्थिती असणार्‍या १२ देशांच्या नावांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. दुसरीच्या इयत्तेतील विद्यार्थी एखाद्या धड्यातील एक शब्दही नीट वाचू शकत नाही, अशा देशांची नावे या सूचीमध्ये आहेत. यात मलावी हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.

जागतिक बँकेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, असे शिक्षण मुले आणि तरुण यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. यातून त्यांचा विकास होऊ शकत नाही. अनेक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देण्यात अपयशी ठरत आहेत. भारतातील तिसरीतील विद्यार्थी लहान लहान प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकत नाही. गणित करू शकत नाही. पाचवीतील ५० टक्के मुले दोन अंकी संख्यांची वजाबाकी किंवा बेरीज करू शकत नाहीत. अशामुळे गरिबी दूर करून समृद्ध समाजाचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकत नाही.


Multi Language |Offline reading | PDF