आम्ही धर्मरक्षण करणार नाही आणि तुम्हाला करू देणार नाही, या वृत्तीचे पोलीस !

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

पुणे येथील थेरगाव घाटावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गौरीविसर्जनाच्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्टला नेहमीप्रमाणे प्रबोधन मोहीम राबवण्यात येत होती. दुपारी पोलिसांनी येऊन समितीच्या कार्यकर्त्यांना ती मोहीम बंद करण्यास भाग पाडले. तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचेच असेल, तर केवळ फलक ठेवा; मात्र कुणीही व्यक्तीने त्या ठिकाणी थांबायचे नाही. अन्यथा तुम्हाला कलम १४९ ची नोटीस बजावू, असे सांगत पोलिसांनी विसर्जन घाटांवरील समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना निघून जाण्यास सांगितले. पिंपरी-चिंचवडच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांनी अन्य पोलीस अधिकार्‍यांना कार्यकर्त्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहून घेण्याचे तोंडी आदेश दिले.

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF