फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथाचे प्रकाशन करतांना मध्यभागी पू. सिरियाक वाले, डावीकडे जेहान मिलो आणि उजवीकडे श्री. गियोम ऑलिव्हिए

रामनाथी (गोवा) – एस्.एस्.आर्.एफ्.चा (स्पीरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचा) फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ हा पहिला ग्रंथ एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले. एस्.एस्.आर्.एफ्.चे फ्रान्समधील साधक श्री. गियोम ऑलिव्हिए यांनी ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ या ग्रंथ फ्रेंच भाषेत भाषांतरित केला आहे. या वेळी श्री. गियोम ऑलिव्हिए यांनी भाषांतराची सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या. अनुभूती सांगतांना त्यांचा भाव जागृत झाला. या सेवेमुळे साधनेला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. समाजाच्या दृष्टीने ही सेवा खूप महत्त्वाची होती. त्यामुळे ते प्रतिदिन १० ते १२ तास सेवा करत असत. श्री. गियोम यांच्या अनुभूती ऐकतांना उपस्थित साधकांचाही भाव जागृत झाला. एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिरासाठी आलेल्या पॅरिसमधील जेहान मिलो यांना हा ग्रंथ भेट देण्यात आला. एस्.एस्.आर्.एफ्.ने आतापर्यंत जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच या तीन भाषांमध्ये ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

श्री. गियोम ऑलिव्हिए यांनी फ्रेंच भाषेत भाषांतरित केलेल्या ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ या ग्रंथाविषयी पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली वैशिष्ट्ये

‘पू. सिरियाक वाले यांनी मला एस्.एस्.आर्.एफ्.चा फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ हा ग्रंथ दाखवला. ग्रंथाकडे पहाताक्षणी मला त्यातून भाव प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. वास्तविक हा ग्रंथ ‘अहं’ याविषयी असूनही मला त्यातून पिवळ्या रंगातील आत्मा बाहेर येत असल्याचे सूक्ष्मातून दिसले. ‘हा ग्रंथ मला हातात धरून ठेवावा’, असे वाटत होते. या ग्रंथाची भाषांतराची सेवा श्री. गियोम ऑलिव्हिए (फ्रान्स) यांनी केली असून त्यांनी ती अतिशय भावपूर्ण आणि शरणागतीने केली असल्याचे जाणवले. ‘श्री. गियोम हा दैवी बालक असावा’, असे मला वाटले. त्याच्यात तळमळ, भाव आणि दायित्व असणार्‍या साधकांना स्वतःहून आढावा देणे इत्यादी अनेक गुण आहेत.’ – (पू.) सौ. योया वाले, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.९.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF