रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार्‍यांवर कारवाई करावी !

म्हापसा येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

म्हापसा – रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ डिचोली, वास्को आणि मडगाव अशा तीन ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. देशाच्या सुरक्षेसाठी घातक प्रवृत्तीच्या रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ असे मोर्चे काढणे म्हणजे एक प्रकारे देशद्रोह आहे. असे मोर्चे गोव्यात अन्य भागांत काढले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत तातडीने सखोल चौकशी व्हावी. हे मोर्चे काढण्याच्या पाठीशी नेमक्या कोणत्या संघटना आहेत, याची चौकशी व्हावी. या सर्व प्रकरणामुळे आणि गोव्यातील अशा संशयास्पद हालचालींमुळे येथील धार्मिक सलोखा आणि शांती यांना ठेच पोहोचली असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहिंग्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणार्‍यांवर देशद्रोहाचे खटले दाखल करावेत, अशी मागणी करणारे निवेदन म्हापसा येथील राष्ट्राभिमानी नागरिकांकडून उपजिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

उपजिल्हाधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सुरेंद्र नाईक यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनाची प्रत म्हापसा पोलीस उपअधीक्षकांना देण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या निवेदनाची प्रत पाठवली जाणार आहे. निवेदन देण्यासाठी म्हापसा येथील राष्ट्रप्रेमी नागरिक तथा गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, शिवसेनेचे माजी अध्यक्ष श्री. रमेश नाईक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी, सौ. अंजली नायक, तसेच सर्वश्री. एकनाथ म्हापसेकर, प्रकाश मळीक, गिरीश, सिद्धेश नार्वेकर, रवि हरिश्‍चंद्र नाईक, प्रविण आसोलकर, नंदकुमार रायकर, उदय मुंज आणि श्री. महेश सावंत आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, म्यानमार येथून हाकलून लावण्यात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांची भारतात झालेली घुसखोरी हा आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय ठरत आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यानुसार ४० सहस्र रोहिंग्या मुसलमान भारतात घुसखोरी करून रहात आहेत. त्यांचे संबंध इसिससारख्या आतंकवादी संघटनेशी असल्याचे देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा देशाच्या सुरक्षेला धोका आहे. हल्लीच अल कायदाचा काश्मीरमधील आतंकवादी झाकिर मुसा याने तर भारत सरकारला रोहिंग्या मुसलमानाांच्या विरोधात काही कृती केल्यास खबरदार ! काश्मीरमध्ये एकही हिंदु शिल्लक रहाणार नाही, अशी धमकी दिली आहे. अशा घुसखोर रोहिंग्यांना पश्‍चिम बंगालमध्ये अवैधरित्या जन्मदाखले आणि चेन्नईमध्ये अवैधरित्या आधारकार्ड मिळाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. रोहिंग्या मुसलमानांनी मारलेल्या २८ हून अधिक हिंदूंची थडगी सापडल्याचा खुलासा म्यानमार सरकारने केला आहे. काही वर्षांपूर्वी या रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ मुंबई येथे आझाद मैदानाच्या ठिकाणी मोठी दंगल घडवण्यात आली होती. अशा परिस्थितीत धार्मिक सलोख्याची प्रतिमा असलेल्या या गोव्यात देशाच्याच सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भात मार्चा काढणे, हे गोवा प्रदेशासाठी घातक आहे.


Multi Language |Offline reading | PDF