बायणा, वास्को येथील अवैध बांधकामाच्या विरोधातील कारवाईत पालिकेने ४० वर्षे जुनी दोन मंदिरे पाडली

अनधिकृत घरे अधिकृत करणार्‍या शासनाला ४० वर्षे जुने मंदिर अधिकृत करायला काय अडचण आली ? अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थळांच्या संदर्भात शासनाने अशी कारवाई केली असती का ?

वास्को, २७ सप्टेंबर (वार्ता.) – दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरून मुरगाव नगरपालिकेने २६ सप्टेंबर या दिवशी बायणा, वास्को येथील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करतांना तेथील श्री बसवेश्‍वर मंदिर आणि श्री लक्ष्मी मंदिर ही सुमारे ४० वर्षे जुनी मंदिरेही पाडली. (४० वर्षांनंतर मंदिर अनधिकृत झाले का ? तोपर्यंत ते अनधिकृत असल्याचे लक्षात न येणार्‍या शासनाला अतिरेकी गोव्यात येऊन राहिले, तरी कसे कळणार ? – संपादक) ही मंदिरे पाडल्याने तेथील भक्तांना दु:ख झाले आहे. मंदिर समितीच्या सदस्यांच्या मते अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाईच्या सूचीत ही मंदिरे असल्याची स्थानिकांना कोणतीच कल्पना नव्हती. तसेच प्रशासनाने मंदिर समितीला यासंबंधी काही कळवलेही नाही. (शासनाचा संतापजनक कारभार ! अशा प्रकारे शासनाकडून अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या का ? – संपादक) श्री बसवेश्‍वर मंदिराचे बांधकाम सिमेंट-काँक्रिटचे होते आणि यासाठी माजी आमदार शेख हसन आणि विद्यमान आमदार मिलिंद नाईक यांनी आर्थिक साहाय्य केले होते.


Multi Language |Offline reading | PDF