भारतीय सैन्याच्या आक्रमक ‘ऑपरेशन अर्जुन’मुळे पाकने शेपूट घातले !

पाकचे ७ सैनिक ठार

सैन्याला हे आधीच शक्य होते, तर तेव्हाच का केले नाही ? आता ते थांबवण्याऐवजी सतत चालू ठेवून पाकला नामोहरम केले पाहिजे !

भारतीय सैन्य ‘ऑपरेशन गांधी-नेहरू’ नव्हे, तर ‘ऑपरेशन अर्जुन’ असे नाव ठेवते, हे लक्षात घ्या !

नवी देहली – सीमेवर सातत्याने गोळीबार करून निरपराध भारतीय नागरिकांना ठार करणार्‍या पाक सैन्याच्या विरोधात भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन अर्जुन’मुळे पाकने शरणागती पत्करत गोळीबार थांबवण्याची एकदा नाही, तर दोनदा विनंती केल्याचे समोर आले आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी या मोहिमेच्या माध्यमातून सीमेवरील पाकिस्तानच्या सैनिकांच्या आणि माजी सैनिकांच्या घरांवर, तसेच शेतात गोळीबार करण्यास प्रारंभ केला होता. यांच्यामुळेच आतंकवादी भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी होतात. त्यामुळेच भारताने या सगळ्यांच्या निवासस्थानांवर गोळीबार केला. त्यात पाकचे ७ सैनिक आणि ११ नागरिक मारले गेले. तसेच पाकच्या अनेक चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या. यामुळेच पाकने भारताला गोळीबार थांबवण्याची विनंती केली. ‘ऑपरेशन अर्जुन’ चालू झाल्यानंतर अवघ्या ३ दिवसांतच पाकने ही विनंती केली. पाक रेंजर्सच्या पंजाबचे मेजर जनरल अजगर नवीद हायत खान यांनी भारतीय सीमा सुरक्षा दलाचे संचालक के.के. शर्मा यांना आठवडाभरात दोन वेळा दूरभाष करून गोळीबार थांबवण्याची विनंती केली. कोणतेही कारण नसतांना पाकने गोळीबार केल्यानेच आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत, असे शर्मा यांनी नावीद यांना ठणकावले.


Multi Language |Offline reading | PDF