संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ डिसेंबरमध्ये संतभूमी देहू आणि आळंदी यांच्या प्रवेशद्वारावर होणार

सनबर्न फेस्टिव्हल महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, संतपरंपरा, धर्मविचार यांचा अनादर करणारा आहे. अमली पदार्थांचा मुक्त वापर, मद्याचे सेवन आदी कारणांमुळे कुख्यात बनलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ हा काळा पैसा पांढरा करण्याचे माध्यम बनले आहे. संत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र भूमीत नशा आणि व्यभिचार करणारा असा कार्यक्रम आयोजित केला जाणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हा संस्कृतीद्रोही आणि कायदाद्रोही कार्यक्रम शासनाने त्वरित रहित करावा, यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक आहे !

पिंपरी-चिंचवड – मागील वर्षी पुण्यातील केसनंद या गावात पर्यावरणाची हानी करणारा आणि अमली पदार्थांची रेलचेल असणारा संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदाच्या वर्षी संतभूमीच्या प्रवेशद्वारावरच होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. मुख्य म्हणजे मागील वर्षी ज्याप्रमाणे कुठल्याही शासकीय खात्याची अनुमती न घेता सिद्धतेला प्रारंभ करण्यात आला होता, तोच प्रकार या वेळीही करण्यात येत असून ऑनलाईन तिकीट विक्री चालू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे.

या विरोधात पुणे येथील रहिवासी आणि कार्यकर्ते मारुति भापकर यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री  विनोद तावडे यांना कार्यक्रमाचा निषेध करणारे पत्र लिहिले असून ‘हा कार्यक्रम पुण्याची संस्कृती नष्ट करेल. गोवा राज्य आधीच कलंकित झाले आहे’, असे नमूद केले आहे. (संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात सरकारला निषेधपत्र पाठवणारे श्री. मारुति भापकर यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून आदर्श घ्यावा ! – संपादक)

१. सनबर्न फेस्टिव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात मद्य, अंमली पदार्थ यांची रेलचेल असून अनेक अपप्रकारही झाले आहेत.

२. पिंपरी-चिंचवडमध्ये होणार्‍या या कार्यक्रमाविषयी पोलीस आणि प्रशासन यांना कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या विषयावर कोणीही बोलण्यास सिद्ध नाही. (पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून कोणतीही अनुमती न घेता कार्यक्रमाच्या घोषणेपासून तिकीटविक्री चालू होते, यावरून आयोजक सरकारला घाबरत नाही, हेच लक्षात येते. अशा आयोजकांवर कारवाई होण्यासाठी आणि कार्यक्रम रहित करण्यासाठी सरकार कोणते पाऊल उचलणार आहे ? – संपादक)

३. मागील वर्षी केसनंद गावातील कार्यक्रमाला प्रचंड विरोध झाला होता. केसनंद गावात अवैध वृक्षतोड आणि तेथील एक टेकडी पाडून सपाटीकरण करण्यात आले होते. त्यामुळे आयोजकांना १ कोटी रुपयांचा दंड झाला होता.

४. केसनंद गावात मद्यबंदीचा ठराव असतांना तो झुगारून हा संस्कृतीहीन कार्यक्रम करण्यात आला होता.

५. viagogo.com या संकेतस्थळावर तिकीट विक्री चालू झाली असून bookmyshow.com, festicket.com या संकेतस्थळावर कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF