बौद्धांची कत्तल करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांचा प्रकाश आंबेडकर यांना पुळका का ? – भाजपचे खासदार अमर साबळे यांचा प्रश्‍न

नवी देहली – म्यानमारच्या बौद्धधर्मीय सरकारने त्यांच्या देशातील रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांच्या विरोधात चालू केलेल्या सैनिकी कारवाईने प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटते; पण याच रोहिंग्यांनी बौद्धांची केलेली कत्तल आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात घडवलेला बॉम्बस्फोट यांमुळे आंबेडकर यांना अस्वस्थ का वाटले नाही ?, असा प्रश्‍न करणारी कठोर टीका भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केली आहे. ‘रोहिंग्या मुसलमानांना मानवतावादी दृष्टीकोनातून भारताने आश्रय द्यावा’, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच केली होती. त्याला साबळे यांनी प्रत्युत्तर दिले.

साबळे पुढे म्हणाले की,

१. म्यानमारमध्ये बौद्धांच्याच कत्तली होत असतांना आंबेडकरांनी कधी आवाज उठवला नाही ? रोहिंग्यांच्या समर्थनासाठी रझा अकादमीने मुंबईत काढलेल्या मोच्यार्र्मध्ये थेट पोलिसांवरच आक्रमण केले, तेव्हा आंबेडकर गुळण्या धरून बसले होते.

२. ‘रोहिंग्या सॉलिडॅरिटी ऑर्गनायझेशन’ या कुख्यात आतंकवादी संघटनेच्या कारवायांकडे आणि त्यांचे समर्थन करणार्‍या ‘हिब्ज-ए- इस्लामी’, ‘जमात -ए-इस्लामी’, ‘हरकत-उल-जिहाद’सारख्या जिहादी आतंकवादी संघटनांकडे आंबेडकर यांनी कानाडोळा केला; पण बौद्धांचा संयम संपत आल्यानंतरही आंबेडकर यांना रोहिंग्यांची दया येते. हा धक्कादायक आणि धोकादायक प्रकार आहे. त्यांनी किमान देशाची सुरक्षितता तरी लक्षात घ्यायला पाहिजे.

३. स्वातंत्र्यानंतर मुसलमानांचा फक्त मतपेढी म्हणून वापर झाला. त्यांच्या दयनीयतेचे चित्र माजी न्यायमूर्ती सच्चर यांच्या अहवालातून उमटलेले आहे. अशा वेळी ‘सबका साथ, सबका विकास’ असे सांगत नरेंद्र मोदी त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत; पण जगाने नाकारलेल्या रोहिंग्यांना भारतीय मुसलमानांच्या तोंडातील घास देण्याचा हा प्रकार आहे.


Multi Language |Offline reading | PDF