पुणे येथे इन्क्युबेटरमध्ये भाजल्याने नवजात बाळाचा मृत्यू

रुग्णालयातील उपकरणांमध्ये येणार्‍या संभाव्य अडचणी लक्षात घेतल्या जात नाहीत का ?

आधुनिक वैद्यांच्या विरोधात गुन्हा नोंद

पुणे – पुणे शहरातील बुधवार पेठेतील ‘वात्सल्य मॅटर्निटी होम’मधील इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या नवजात बालकाचा इन्क्युबेटरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे ८० टक्क्यांहून अधिक भाजल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ‘वात्सल्य मॅटर्निटी होम’चे स्त्रीरोग तज्ञ आधुनिक वैद्य गौरव चोपडे आणि त्यांचे कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्री. विजयेंद्र आणि स्वाती कदम या दाम्पत्याला मुलगी झाली. शस्त्रक्रिया करून बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने इन्क्युुबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. शॉर्ट सर्किटमुळे इन्क्युबेटरचे तापमान वाढले, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना २६ सप्टेंबर या दिवशी घडली.


Multi Language |Offline reading | PDF