मेजर रमेश उपाध्याय यांना ९ वर्षांनी जामीन संमत

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

निरपराध मेजर रमेश उपाध्याय यांना केवळ जामीन देण्यावर न थांबता त्यांना आणि अन्य आरोपींना यातून निर्दोेष म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे ! ज्या अन्वेषण अधिकार्‍यांनी खोट्या आरोपांखाली मेजर उपाध्याय यांना ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले आणि त्यांच्या आयुष्यातील ही वर्षे वाया घालवली, त्या अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे आणि या अधिकार्‍यांकडून मेजर उपाध्याय यांना हानीभरपाई दिली गेली पाहिजे, अशी सर्वत्रच्या हिंदूंची मागणी आहे !

मुंबई – वर्ष २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेले मेजर रमेश उपाध्याय यांना ९ वर्षांनंतर २६ सप्टेंबरला जामीन संमत करण्यात आला. उपाध्याय यांना जामीन देतानाच त्यांना देशाबाहेर जाण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित, श्री. सुधाकर चतुर्वेदी आणि श्री. सुधाकर द्विवेदी यांनाही या प्रकरणी जामीन मिळाला आहे.

२६ सप्टेंबरला उच्च न्यायालयात मेजर रमेश उपाध्याय यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या वेळी उच्च न्यायालयाने त्यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचा आदेश दिला.


Multi Language |Offline reading | PDF